Sanjay Raut VS Chhagan Bhujbal : मराठा (Maratha) समाजाला कुणबी (Kunbi) म्हणून ओबीसींमधून आरक्षण देण्यासाठी सरकार(Government) ने नुकत्याच काढलेल्या जीआर(GR) वर नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज जोरदार निशाणा साधला. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मुद्यावरून तुम्ही शिवसेना सोडली. आता ओबीसीं (OBC) वर तुमच्याच सरकारकडून अन्याय होत असताना मंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) का देत नाही, असा सवाल राऊत यांनी भुजबळांना उद्देशून केला.
छगन भुजबळांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्रिमंडळात स्थान दिले नव्हते. मोदी आणि शहांच्या कृपेने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मोदी स्वतःला ओबीसींचे मोठे नेते मानतात. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यापासून भुजबळ नाराज आहेत. सरकारने ओबीसी समाजावर अन्याय केला अशी त्यांची तक्रार आहे. याच भुजबळांनी एकेकाळी मंडल आयोगावरून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ सोडली होती. मग आता त्यांचेच सरकार ओबीसींवर अन्याय करत असताना ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर का पडत नाहीत, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
याप्रसंगी राऊत यांनी भाजपावर जाती-जातींमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप केला. जात आणि उपजात असे गट निर्माण करून त्यांच्यात फूट पाडण्यासाठी समित्या स्थापन करण्याचा खेळ भाजपाने चालवला आहे. या समित्या आणि महामंडळांमुळे कोणालाही कसलाही लाभ होणार नाही. फक्त परशुराम विकास मंडळाला तेवढा लाभ होईल, अशी बोचरी टीका करत राऊत यांनी भाजपाच्या ब्राह्मणवादाकडे निर्देश केला.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
किम-पुतिन भेटीनंतर जोंग यांच्या ग्लाससह खुर्ची व ठशांची सफाई