Santosh Deshmukh Case : बीडच्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक वर्ष उलटून गेले तरी त्यांना अजूनही न्याय मिळाला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मागच्या वर्षभरापासून या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरु आहे. आज संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि टोळीविरुद्ध कोर्टात आरोप निश्चितीची सुनावणी सुरु होती.
या सुनावणीआधी एक मोठी बातमी समोर आली आहे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला सरकारी वकील उज्वल निकम लढत आहेत. उज्वल निकम यांना बदलण्यात यावं अशी मागणी आज न्यायालयात आरोपीच्या वकिलांकडून करण्यात येत आहे.
उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यामुळे याचा या केसवर परिणाम होत असल्याचे कारण देत थेट आरोपीच्या वकिलांकडून न्यायालयात आज उज्वल निकम यांना बदलण्यात यावं असा अर्ज करण्यात आला. आता या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक









