मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीतील विजयी मेळाव्यात (victory rally)कार्यकर्त्यांना मराठीसाठी प्रेमाने समजावून सांगा आणि जर कोणी मुजोरी केली तर कानाखाली बसवलीच पाहिजे, पण मारहाण केल्याचा व्हिडीओ काढू नका असा सल्ला दिला. पण विक्रोळीत (Vikhroli) मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून एका दुकानदाराला मारहाण केली असून त्यांची धिंड काढली आणि त्यांचा व्हिडीओ काढला (filming the incident). हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल (viral video) झाला आहे.
सदर दुकानदार (shopkeeper)मारवाडी समाजातील असल्याचे सांगितले जात आहे. त्याने व्हॉट्सॲप स्टेटसवर मराठी माणूस (Marathi people)व महाराष्ट्राबद्दल (Maharashtra)आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. याच मुद्द्यावरून मनसे कार्यकर्ते सकाळी त्याच्या दुकानात पोहोचले व त्याला जाब विचारात मारहाण केली. व्हायरल व्हिडीओमध्ये मनसेचे पदाधिकारी विश्वजीत ढोलम हे सदर दुकानदाराला माफी (apologize)मागायला लावताना, मारहाण करताना व बाजारात धिंड काढताना दिसत आहेत.
मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, आम्हाला आमची ताकद दाखवायची नाही. पण कोणी महाराष्ट्रात येऊन इथून पैसे कमवत असेल आणि मराठी माणसाचा अपमान करत असेल, तर त्याला धडा शिकवला जाईल.