मुंबई – महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने (Nurses Association)कंत्राटी भरती विरोधात आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभरात कामबंद आंदोलन (protest)पुकारले. काल मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या चर्चेला यश न आल्याने हे पाऊल उचलण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) राज्यभरातील परिचारिकांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. शासनाने लवकर निर्णय घेतला नाही तर उद्यापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा संघटनेने दिला. राज्यातील सुमारे ५० हजार परिचारिका (Around 50,000 nurses)या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
राज्य शासनाने कोरोना (COVID-)काळातील भत्ता त्वरीत द्यावा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, गणवेश भत्ता (uniform allowance)मिळावा, थकीत भत्त्यांचे (pending allowances)तत्काळ वितरण करावे, कंत्राटी भरती (contractual recruitment)थांबवून नियमित पदभरती करावी, वेतनातील त्रुटी दूर करून प्रोत्साहन भत्ता लागू करावा, १०० टक्के पदनिर्मिती व पदभरतीची अमलबजावणी (100% post creation and recruitment)करावी अशा मागण्या परिचारिकांची केल्या आहेत.
नांदेड, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर,लातूर, अमरावती, नागपूर येथील परिचारिकांनी आंदोलन करत सरकारचा निषेध केला. मीरा-भाईंदर शहरातील महानगरपालिका रुग्णालय टेंभा येथील परिचारिकांनी काम बंद आंदोलन केले. विधानसभेत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी परिचारिकांच्या वेतनाचा मुद्दा आज उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, मानधन वाढीबाबत आम्ही चर्चा करून लवकर निर्णय घेऊ.
परिचारिका म्हणाल्या की, काल मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif)यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत केवळ काही मुद्द्यांवर चर्चा झाली. शासनाला वेळ द्या, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली. या आधी आम्ही शासनाला वेळ दिला होता. २०२२ मध्येही आम्ही उपोषण, काम बंद आंदोलन केले होते. त्या वेळेस सरकारने कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला. पण आता आता पुन्हा शासनाने कंत्राटी भरतीचा घाट घातला आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले जात आहे. पण त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मंजूर केले जात नाही. ५० टक्के पद रिक्त आहेत. पण भरती केली जात नाही. केली तर ती कंत्राटी पद्धतीने केली जाते. आमची मागणी आहे की, १०० टक्के पद निर्मिती आणि पद भरती करावी. आम्हाला आश्वासन नको.