Home / महाराष्ट्र / सुनेत्रा पवार RSS च्या बैठकीत; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, स्वतः दिले स्पष्टीकरण

सुनेत्रा पवार RSS च्या बैठकीत; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण, स्वतः दिले स्पष्टीकरण

Sunetra Pawar RSS Meeting

Sunetra Pawar RSS Meeting: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar RSS Meeting) यांचा एक फोटो सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला आहे.

भाजप खासदार कंगना रणौतच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या एका बैठकीत त्या सहभागी झाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या एका महत्त्वाच्या नेत्याची पत्नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) महिला शाखेच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क सुरू झाले. यावरून टीका झाल्यानंतर अखेर सुनेत्रा पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

विशेषतः, सुनेत्रा पवार यांचे पुतणे आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर जोरदार टीका केली आहे. “एकिकडे स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि दुसरीकडे RSS च्या बैठकांना उपस्थिती दर्शवायची, हा दुटप्पीपणा आहे,” असे आरोप त्यांनी केले आहेत.

विरोधकांनी या वादावर अजित पवारांनी थेट प्रतिक्रिया देण्यास टाळले. “बायको मिनिटा-मिनिटाला कुठे जाते, ते मी विचारत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवारांनी दिले स्पष्टीकरण

या वादावर राजकीय अर्थ काढला जात असल्याचे लक्षात येताच, सुनेत्रा पवार यांनी स्वतः त्यांच्या ‘एक्स’ (X) हँडलवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचा या बैठकीत सहभागी होण्याचा कोणताही राजकीय उद्देश नव्हता.

ट्विटमध्ये त्या म्हणाल्या की, एका मीटिंगमध्ये माझ्या उपस्थितीबाबत चर्चा सुरू आहे, ज्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी होत्या. राज्यसभेची खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असताना, मला विविध महिला संघटनांच्या कामाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याची उत्सुकता असते.

त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्या वेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये. समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.


हे देखील वाचा –

Dream 11 ॲप कायमचे बंद होणार? ऑनलाइन गेमिंग विधेयकामुळे कोट्यावधीचा व्यवसाय धोक्यात, ‘या’ ॲप्सना मोठा फटका

Hero MotoCorp ची नवीन Glamour X 125 बाईक लाँच; किंमत 90 हजार रुपयांपेक्षा कमी

रेल्वे प्रवासासाठी आता ‘एअरपोर्ट’सारखे नियम; सामानाचे वजन तपासले जाणार; जाणून घ्या बदल

Share:

More Posts