Home / महाराष्ट्र / Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून १४५ कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंनी मात्र आरोप फेटाळले

Sushma Andhare : सुषमा अंधारेंकडून १४५ कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंनी मात्र आरोप फेटाळले

Sushma Andhare : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता अशातच सुषमा अंधारेंच्या खळबळजनक आरोपामुळे पुन्हा एकदा...

By: Team Navakal
Sushma Andhare
Social + WhatsApp CTA

Sushma Andhare : आगामी निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. आता अशातच सुषमा अंधारेंच्या खळबळजनक आरोपामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नाव घेऊन १४५ कोटींच्या ड्रग्जचे गंभीर आरोप केले आहेत. प्रकाश शिंदे हे एकनाथ शिंदेंचे भाऊ असून त्यांच्या साताऱ्यातील सावरी गावात असलेल्या रिसॉर्टमध्ये ४५ किलो ड्रग्ज (Drugs) सापडल्याचा गंभीर दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.

याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की,१३ डिसेंबर रोजी सावरी गावात ही कारवाई करण्यात आली, मात्र या प्रकरणाची माहिती जाणीवपूर्वक दडपण्यात आली. या कारवाईचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले असून, विशाल मोरे याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. पोलिसांनी प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्ट परिसरातील शेडमध्ये ही कारवाई केली होती.या शेडचा मालक गोविंद सिंदकर असून, शेडची चावी ओंकार दिघे याने घेतल्याची माहिती गोविंद सिंदकरने पोलिसांना दिली. या प्रकरणात एफआयआरमध्ये असायला हवी असलेली तीन नावे वगळण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला पाहिजे. हे प्रकरण उघडकीला आणल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सुरक्षेची हमी द्यावी. असेही त्या म्हणाल्या.

सुषमा अंधारे यांचे आरोप सपशेल खोटं आहेत, हे सगळे विरोधकांचे षडयंत्र आहे. ज्या स्पॉटवर हे ड्रग्स सापडलं आहे, एकतर तिथून तीन ते साडे तीन किमी लांब ती जागा आहे. पोलिसांच्या अहवालानुसार याची सर्वांनी माहिती घ्यावी. माझ्या जागेशी त्या घटनेचा काहीही संबंध नसल्यचे देखील ते म्हणाले. तो माझा रिसॉर्ट नसून ६ महिन्यांपूर्वी रणजीत शिंदे यांना ती जागा दिलेली आहे, असा दावाही प्रकाश शिंदे यांनी केला आहे.

पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली हे चांगलं आहे. पोलिस तपासात सगळं समोर आलं आहे, जे ड्रग्ज सापडले त्यानुसार कारवाई केली पाहिजे. मात्र, माझ्यावरील सर्व आरोप हे अत्यंत खोटे आणि चुकीचे आणि यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे देखील प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.


हे देखील वाचा – Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट! औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फोटाळला

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या