Home / महाराष्ट्र / Mundhwa plot scam : पार्थ पवार प्रकरणी निलंबित तहसीलदाराने 85 लाख रोख भरले

Mundhwa plot scam : पार्थ पवार प्रकरणी निलंबित तहसीलदाराने 85 लाख रोख भरले

Mundhwa plot scam – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात (Mundhwa plot scam) आरोपी...

By: Team Navakal
सूर्यकांत येवले तहसीलदार
Social + WhatsApp CTA

Mundhwa plot scam – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित मुंढवा भूखंड घोटाळ्यात (Mundhwa plot scam) आरोपी असलेले निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची आपल्या कुटुंबियांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरूपात भरली आहे. एका सरकारी अधिकार्‍याकडे एवढी रोख रक्कम कुठून आली,  असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळसरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


विजय कुंभार यांनी आज सोशल मीडियावर एक पोस्ट करून हा मुद्दा उपस्थित केला. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले याने कुटुंबियांची पतसंस्थेची 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख भरली. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेली आहे. एका सरकारी अधिकार्‍याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचा प्रकार दिसतो. ईडी  व सरकारने तत्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी.


कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सूर्यकांत येवले यांनी जमा केलेल्या 85.50 लाखांच्या मूळ स्त्रोताची अतिशय सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या व्यवहारात सहभागी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, तिचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची चौकशी करावी. हा व्यवहार मुंढवा जमीन घोटाळ्यातील पैसे वळवण्यासाठी केला गेला का? याची स्वतंत्र चौकशी आर्थिक गुन्हे शाखा व अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत केली जावी. सदर व्यवहारात कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित आरोपी, जामीनदार, संस्थेतील जबाबदार पदाधिकार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकरणातील आर्थिक बाबींमागे प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचा संशय निर्माण होत आहे.

पुण्यातील मुंढवा भूखंड खरेदी घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवार अडचणीत सापडले असून, त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1,800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत घेतल्याचा आरोप आहे. शिवाय या व्यवहाराची केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली.  या प्रकरणी पोलिसांनी मूळ वतनदारांची कुलमुखत्यारपत्र तयार करणार्‍या शीतल तेजवानीला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबियांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरूपात भरल्याचे उघड झाल्याने त्यांच्याबाबत संशय आणखी बळावला आहे. या प्रकरणातील आरोपी पार्थ पवार यांचे मामेभाऊ यांची उद्या चौकशी होणार आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

बेळगावात हिवाळी अधिवेशन ;मराठी मेळाव्याला परवानगी नाही

 हैदराबादमधील रस्त्याला ट्रम्प यांचे नाव देणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या