वाढदिवसानिमित्त बारा वर्षांनी तटकरे कुटुंबीयांचे मनोमिलन

Tatkare family reunited after 12 years

मुंबई – राजकीय मतभेदांमुळे वेगळे झालेलेअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे कुटुंबीय तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र आले. सुनील तटकरे यांच्या ७०व्या वाढदिवसाला सुनील तटकरे यांचे भाऊ (brother)अनिल तटकरे आणि पुतणे (nephew) अवधूत तटकरे उपस्थित होते.

२०१४ मध्ये अनिल तटकरे (Anil Tatkare)यांनी सुनील तटकरे यांची साथ सोडून वेगळी वाट धरली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची (Ajit Pawar)साथ दिली. त्यामुळे रायगडमध्ये (Raigad

)राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. सुनील तटकरेंच्या विरोधात शरद पवारांनी खेळी करत अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची (Sharadchandra Pawar faction) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. माझे बंधू मला सोडून गेले नाही. २०१४ पासूनच इतर पक्षांमध्ये कार्यरत आहेत. माझी साथ सोडून कोणीही कुठे गेले नाही असे वक्तव्य पिंपरी येथे सुनील टाकरे यांनी एका कार्यक्रमात केले होते.
सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आणि मुलगा अनिकेत तटकरे राजकारणात आल्यानंतर पुतण्या अवधूत तटकरे (Avdhoot Tatkare) यांचे सुनील तटकरे यांच्यासोबत मतभेद झाले. अवधूत तटकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेतील अंतर्गत संघर्षांमुळे त्यांनी २०२२ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर तब्बल १४ वर्षानंतर अनिल आणि सुनील तटकरे एकत्र आले.