Tejasvee Abhishek Ghosalkar : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल होताना दिसत आहेत. या निवडणुकांच्या दरम्यान महाराष्ट्रात अनेक पक्ष प्रवेश होताना देखील दिसत आहे. पण यावेळेला उद्धव ठाकरे गटाला मात्र प्रक्षप्रवेशाचा मोठा फटका बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून काढता पाय घेतला आहे. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षात जोरदार प्रवेश केला आहे.
मागच्या काही काळापासून तेजस्वी घोसाळकर या प्रचंड चर्चेत होत्या. राजकीय करणासोबतच त्या त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत देखील बऱ्याच चर्चेत राहिल्या आहेत. ८ फेब्रुवारी राेजी अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकर हे मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयात एका कार्यक्रमानिमित्ताने गेले होते. या कार्यक्रमाचे नरोन्हा याने फेसबुक लाइव्ह सुरु केले होते. हे फेसबुक लाइव्ह संपतेवेळी त्याने घोसाळकर यांच्यावर निर्घृणपणे गोळ्या झाडत त्यांची हत्या केली. त्यानंतर लगेच त्याने स्वतः देखील स्वतःवर गोळ्या झाडत आपली आत्महत्या केली. त्यानंतर चर्चेत आल्या त्या तेजस्वी घोसाळकर आणि पर्यायाने त्याचं कुटुंब देखील त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल चांगलंच चर्चेत आलं.
आणि आता पुन्हा एकदा वर्षभराने तेजस्वी घोसाळकर या त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल चर्चेत आल्याचे दिसून येत आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमीत साटम व विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज मुंबईत तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपात मोठ्या थाटात पक्षप्रवेश केला. आणि त्यापूर्वी मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर केल्यानंतर विविध चर्चाना उधाण आले होते.
तेजस्वी घोसाळकर यांची जून २०२५ मध्ये भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबई बँकेच्या (Mumbai Bank) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हापासून तेजस्वी घोसाळकर या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपमध्ये (BJP) जातील, अश्या चर्चा देखील रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर याआधी तेजस्वी घोसाळकर यांनी स्पष्टपणे आपले मत मांडले होते. मी शिवसेना सोडण्याचा विचार केला नाही आहे असं देखील त्या म्हणाल्या होत्या.
त्यानंतर आता भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी देखील सवांद साधला पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आभार देखील मानले आहेत. शिवाय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपात येण्याचा त्यांचा निर्णय किती वेदनादायी आणि किती कठीण होता याबद्दल सांगितले आहे.
नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत. वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही ! अशी भावनिक पोस्ट देखील त्यांनी समाजमाध्यमांवर केली आहे.
तेजस्वी यांनी सांगितले पक्ष सोडण्याचे कारण :
माझ्या प्रभागामधील विकासकामांसाठी मी हा कठोर निर्णय घेतला आहे. मला खूप गोष्टी बोलायची इच्छा आहे. मात्र, कसं बोलावं ते समजत नाही. मला माझ्या प्रभागात विकासाची कामं करायची आहेत. त्यामुळे मी भाजपात प्रवेश केला आहे.”असं त्या म्हणाल्या.
नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत…
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) December 15, 2025
वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही !
जय महाराष्ट्र pic.twitter.com/HS5lsAs1Q7
पुढे त्यांनी त्यांची इच्छा देखील व्यक्त केली आपल्या दिवंगत पती बद्दल त्या सांगतात माझे पती अभिषेक यांची हत्या झाली आहे. त्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो तपास करत आहेत. मात्र हा तपास अतिशय संथगतीने चालू आहे. तो तपास अत्यंत वेगाने होईल अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे. भाजपा व मुख्यमंत्री आमच्या अपेक्षा पूर्ण करतील.”हि आशा असे देखील त्या म्हणालाय. त्यामुळे आता तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मात्र कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.
हे देखील वाचा – Pune Crime : पुण्यात लहानमुलांमध्ये मोठा राडा; खाजगी क्लासमध्येच केली गळा चिरून हत्या..









