Mumbai Maratha Protest : मराठा आरक्षणा (Maratha Reservation)साठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आझाद मैदानातील उपोषणाचा ( Mumbai Maratha Protest) आज तिसरा दिवस आहे. या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत आहेत. आंदोलकांचे दोन दिवस मोठे हाल झाले. या पार्श्वभूमीवर उबाठा (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आंदोलकांच्या जेवणाची व इतर सोयींची पूर्ण जबाबदारी घ्यावी, अशा सूचना शिवसैनिकांना केल्या होत्या. त्यानुसार, उबठाकडून दररोज किमान १० हजार लोकांच्या जेवणाची सोय करण्याची तयारी करण्यात येणार आहे.
उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणाले की, आम्ही एक लाख लोकांच्या जेवणाची तयारी केली आहे. मात्र जितकी आवश्यकता असेल तितकेच ताजे जेवण तयार करून आंदोलकांना पुरवले जाणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही रोज दुपारचे, संध्याकाळचे जेवण आणि नाश्त्याची सोय करत आहोत. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू राहील, तोपर्यंत मराठा बांधवांची जेवण व्यवस्था आम्ही करत राहू. दरम्यान, आंदोलनस्थळी बाहेरूनही मोठ्या प्रमाणात जेवण येत असल्याने गरजेनुसार पुरवठा नियंत्रित ठेवला जाईल, असेही उबाठाने स्पष्ट केले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा-
जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका