Home / महाराष्ट्र / Navratri: यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !

Navratri: यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !

Navratri- यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने नवरात्र (Navratri) हे दहा दिवसांचे आले आहे.सोमवार २२सप्टेंबर पासून १ आक्टोबर...

By: Team Navakal
Navratri

Navratri- यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी होत असल्याने नवरात्र (Navratri) हे दहा दिवसांचे आले आहे.सोमवार २२सप्टेंबर पासून १ आक्टोबर पर्यंत नवरात्रोत्सव आहे. गुरुवार २ आक्टोबर रोजी विजया दशमी, दसरा सण आहे असे पंचांगकर्ते खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. नवरात्रातील नवरंगा विषयी श्री. दा.कृ.सोमण म्हणाले की आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले धान्य घरात येत असते. म्हणून नवरात्र उत्सव हा निर्मिती शक्तीचा, आदिशक्तीचा उत्सव असतो.
नवरात्री नवरंग हे वातावरण ठरवले जातात.

यावर्षीचे रंग

१)सोम.२२ सप्टेंबर – सफेद/पांढरा
२) मंगळ.२३ सप्टेंबर – लाल
३) बुध.२४ सप्टेंबर – निळा
४) गुरू.२५ सप्टेंबर – पिवळा
५) शुक्र.२६ सप्टेंबर – हिरवा
६) शनि.२७ सप्टेंबर – करडा/ग्रे
७) रवि. २८ सप्टेंबर – केशरी/भगवा
८) सोम.२९ सप्टेंबर- मोरपिशी/पिकाक ग्रीन
९) मंगळ.३० सप्टेंबर- गुलाबी.
१०) बुध.१ आक्टोबर – जांभळा.


हे देखील वाचा –

तब्बल दीड लाख रुपयांची कपात! टोयोटाची सर्वात लोकप्रिय गाडी झाली खूपच स्वस्त

गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! नवीन GST नियमांमुळे Hyundai Aura झाली खूपच स्वस्त, वाचा किंमत

या 5 वेब सिरीजने OTT वर घातलाय धुमाकूळ! लगेच पाहून घ्या

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या