BJP Protest -पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी (Heeraben)यांच्यावर आधारित एआयद्वारे तयार केलेल्या व्हिडिओच्या निषेधार्थ मुंबईत भाजपाने आज आमदार चित्रा वाघ (MLC Chitra Wagh)यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. या वेळी भाजपाने काँग्रेस खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi)यांच्यावर मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला.
हा व्हिडिओ बिहार काँग्रेसने (Bihar Congress) दोन दिवसांपूर्वी एक्सवर पोस्ट केला होता. त्यात पंतप्रधान मोदींच्या आई स्वप्नात येऊन त्यांना राजकारणात अजून किती घसरणार? असा सवाल करताना दाखवण्यात आले आहे. या घटनेविरोधात भाजप महिला आघाडीकडून नाशिक, अमरावती आणि कल्याणमध्येही आंदोलन करण्यात आले.
कल्याणमध्ये (Kalyan)आमदार सुलभा गायकवाड, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निषेध फलक दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, शरम करो काँग्रेस पार्टी अशी घोषणाबाजी करण्यात आली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, हा केवळ पंतप्रधान मोदींच्या आईचाच नाही, तर देशातील प्रत्येक आईचा अपमान आहे. राहुल गांधींना शिष्टाचार शिकवले गेले नाहीत. काँग्रेसने बिहार निवडणुकीपूर्वीच पराभव दिसत आहे, त्यामुळे मुद्दे आणि जाहीरनाम्याऐवजी आता ते वैयक्तिक हल्ल्याबोल करत आहेत.
हे देखील वाचा –
नारी शक्तीचा गौरव! भारतीय महिला अधिकारी ‘समुद्र प्रदक्षिणा’ मोहिमेवर; करणार 26,000 नॉटिकल मैल प्रवास
दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी
आता थेट रोबोट चालवणार सरकार? ‘या’ देशाने सरकारी कामांसाठी नेमला ‘AI मंत्री’