डोंबिवली – आयुष्याची पुंजी जमवून (savings)विकासकाला पैसे देऊन घर विकत घेतले.पण यात आमची फसवणूक होत आहे हे आम्हाला माहीत नव्हते. आम्ही पालिकेत कर भरतो. पण ९ डिसेंबरला रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) आम्हाला नोटीस (notices)बजावली आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली.आम्ही अतिक्रमण केले नाही, आमची फसवणूक झाली आहे.आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की, आम्हाला बेघर करू (homeless)नका.आमचे पुनर्वसन (Rehabilitate)करा,आम्हाला मोबदला द्या,असा आक्रोश डोंबिवलीतील २०९ घरातील कुटुंबीयांनी केला आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील (Dombivli West) गणेशनगर येथील भगवान काटे नगर मधील चाळीतील ४१० घरांपैकी (410 homes in Bhagwan Kate Nagar)२०९ घरांना रेल्वे प्रशासनाने नोटीस बजावली आहे. रेल्वे जागेवर (railway land)अतिक्रमण केल्याचे नोटीसमध्ये नमूद केले असल्याने तेथील रहिवाशांनी याबाबत चर्चा करण्याकरता त्याच ठिकाणी गणेशनगर पुनर्वसन कृती समितीने (Ganesha Nagar Rehabilitation Action Committee)एक सभा घेतली. समितीचे अध्यक्ष शिवशंकर धबडगे, सेक्रेटरी संदीप सावंत, खजिनदार सचिन कांबळे,कार्याध्यक्ष रामदास साटम,उपाध्यक्ष श्रद्धा वाढवळ ,बबन बेर्डे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत येथील रहिवाशी मोठ्या संख्येने आले होते.या सभेत रहिवाशांनी आपल्या व्यथा मांडल्या. माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे व रिपाई (आठवले गटाचे ) झोपडपट्टी महासंघांचे पदाधिकारी माणिक उघडे हेही उपस्थित होते.या समितीने डोंबिवली विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण,कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पत्र दिले.यावेळी येथील माजी नगरसेवक जनार्दन म्हात्रे हे या रहिवाशांच्या पाठीशी राहणार असल्याचे समितीने सांगितले.