Maratha Protesters: मुंबईत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांनी उपोषण कायम ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Cm Devendra Fadnavis )यांना इशारा दिल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाला नवी धार चढली. जरांगेंच्या आक्रमक भूमिकेमुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच बीड (Beed)जिल्ह्यात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये आंतरावली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले आणि अनेक आंदोलकांवर गुन्हे नोंदवले गेले. बीड आणि माजलगाव (Majalgaon) येथे ३० ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. काही नेत्यांची घर, हॉटेल्स, कार्यालये जाळण्यात आली होती, तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आणि टायर जाळण्याच्या घटना घडल्या होत्या.
बीड जिल्ह्यात आता या प्रकरणांचा आढावा घेण्यास सुरुवात झाली आहे. आंदोलनादरम्यान नोंदवलेल्या खटल्यांत जीवितहानी झालेली नसावी आणि खासगी वा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान ठराविक मर्यादेपेक्षा जास्त नसावे, अशा निकषांवर आधारित प्रकरणे मागे घेतली जाणार आहेत. यासाठी ८ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मॅरेथॉन स्पर्धेच्या बॅनरवरून वाद ; काँग्रेस जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा
पुतिन-जिनपिंग यांच्यासोबत मोदींना बघणे लाजीरवाणे ! ट्रम्प सल्लागाराचे मत