9 वर्षांनी रिलीज झालेल्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई

Sanam Teri Kasam Collection: गेल्याकाही महिन्यांपासून जुने चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा ट्रेंड वाढला. तुंबाड, कल हो ना हो. जिंदगी ना मिलेगी दोबारा सारखे चित्रपट पुन्हा बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. आता या लिस्टमध्ये 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 9 वर्षांनी रिलीज झालेल्या अभिनेता हर्षवर्धन राणे आणि अभिनेत्री मावरा होकेन या चित्रपटाला पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी होत आहे.

या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही कमाई मूळ रिलीजच्या संपूर्ण कमाईपेक्षा जास्त आहे. या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 4 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 5 कोटी रुपयांची कमाई केली. 

9 वर्षांनी रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून सर्वचजण चकित झाले आहेत. पुन्हा रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट अनपेक्षितपणे हिट ठरला आहे.

ओटीटी आणि टीव्हीवर प्रचंड लोकप्रियतेमुळे या चित्रपटाला पुनर्प्रदर्शनात मोठा प्रतिसाद मिळत आहे. याआधीही लैला मजनू आणि तुंबाड यांसारखे चित्रपट सुरुवातीच्या प्रदर्शनात अपेक्षित यश मिळवू शकले नव्हते, मात्र नंतर रिलीज झाल्यानंतर चांगली कमाई केली. सनम तेरी कसम या यशस्वी लिस्टमध्ये सामील झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधिका राय आणि विनय सपरू यांनी केली आहे.