Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिने व्यक्तिमत्त्व आणि प्रसिध्दी याबाबतीतील हक्क सुरक्षित ठेवणे व नाव, फोटो, आवाजाच्या अनधिकृत वापरावर बंदीची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने तिला दिलासा देत नमूद केले की, अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्व हक्काचे उल्लंघन करणाऱ्या वेबसाईट्स, लिंकवर बंदी घालण्यासाठी अंतरिम आदेश दिले जातील.
ऐश्वर्या राय बच्चनचे अॅड. संदीप सेठी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, इंटरनेट (Internet) वर अनेक ठिकाणी अभिनेत्रीच्या ऐश्वर्याचे छायाचित्र परवानगीशिवाय वापरला जात आहे. हे तिच्या वैयक्तिक हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. एआय जनरेटेड किंवा अस्सल फोटो कॉफी मग, वस्त्र आणि इतर वस्तूंवर वापरले जातात. तर काही ठिकाणी अश्लीलतेसाठीही त्यांचा वापर होतो.
न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी सांगितले की,अभिनेत्रीचे व्यक्तिमत्व हक्क आणि प्रसिध्दी हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुक, यूट्यूबसह अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून मॉर्फ केलेल्या किंवा अनधिकृतपणे वापरल्या जाणाऱ्या युआरएल हटवण्याचे आदेश देण्यात येतील. प्रत्येक प्रतिवादीविरोधात आम्ही आदेश देणार आहोत. मागण्या व्यापक आहेत. मात्र प्रत्येकासाठी स्वतंत्र स्थगिती आदेश जाहीर करू.
हे देखील वाचा –
‘अनेकांना वाटलं माझी राख होतेय, पण…’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य
15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणार ‘हे’ दमदार स्मार्टफोन्स; Samsung आणि Redmi वर मोठी सूट
रायगडमध्ये साखरचौथ गणेशोत्सवाची तयारी ! ८८० मूर्तींची प्रतिष्ठापना होणार