Andaz Apna Apna Re-Release Collection | जुने चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा ट्रेंड वाढला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच आमिर खान (Aamir Khan) आणि सलमान खानचा (Salman Khan) सुपरहिट विनोदी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna) पुन्हा प्रदर्शित झाला आहे. 30 वर्षांनी रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्याच दिवशी जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
हा चित्रपट आधी 1994 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटात रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ती कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटाने पुन्हा एकदा थिएटरमध्ये पुनरागमन केले आहे आणि जवळपास 30 वर्षांनंतर प्रेक्षकांना अमर-प्रेमची मजेदार जोडी पुन्हा पाहायला मिळत आहे.
‘अंदाज अपना अपना’ झाला रिलीज
‘अंदाज अपना अपना’ च्या पुन्हा प्रदर्शनासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. सलमान खान आणि आमिर खानच्या या चित्रपटाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस यांसारख्या देशातील 3 प्रमुख मल्टीप्लेक्स चेनमध्ये सुमारे 5500 ॲडव्हान्स तिकीटं विकली गेली होती. हा आकडा नुकताच रिलीज झालेल्या इमरान हाश्मीच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटापेक्षा चांगला होता. ‘ पहिल्या दिवशी या चित्रपटाने 25 लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.
‘अंदाज अपना अपना’ 4K क्वालिटीमध्ये रिलीज:
‘अंदाज अपना अपना’ चित्रपट 4K क्वालिटी आणि डॉल्बी 5.1 साउंडमध्ये रीमास्टर करून रिलीज करण्यात आला आहे. याचा नवीन ट्रेलर 7 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 1994 मध्ये बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. विनय कुमार सिन्हा दिग्दर्शित या विनोदी चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 5.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता.