Home / मनोरंजन / Ankita Walavalkar : ‘Bigg Boss 19’ मध्ये होणार अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? मजेशीर व्हिडिओ शेअर करत म्हणाली..

Ankita Walavalkar : ‘Bigg Boss 19’ मध्ये होणार अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? मजेशीर व्हिडिओ शेअर करत म्हणाली..

Ankita Walavalkar Bigg Boss: सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) हा शो सुरू झाल्यापासूनच चर्चेत...

By: Team Navakal
Ankita Walavalkar Bigg Boss

Ankita Walavalkar Bigg Boss: सलमान खान होस्ट करत असलेला ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) हा शो सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. घरात होणारे वाद आणि नाट्यमय घडामोडींमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता या आठवड्यात एका नव्या स्पर्धकाची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar) हिने एक व्हिडिओ शेअर केल्याने या चर्चांना उधाण आले आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, “नमस्कार मंडळी! जसं की तुम्हाला माहितीये, ‘बिग बॉस’ हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होतेय आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या वेळेस मी ‘बिग बॉस’ बघितला नव्हता. पण आता, माझ्या गाठीशी अनुभवसुद्धा आहे. त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे.” ती पुढे असं म्हणते, “तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्याबरोबर राहू द्या. तुमचं हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत…” आणि तेवढ्यातच तिचा नवरा कुणाल आणि तिची बहीण तिला झोपेतून उठवतात.

या व्हिडिओच्या शेवटी अंकिता हिंदी बिग बॉसमध्ये जाण्याचं स्वप्न बघत असल्याचं समोर येतं. ‘आता गेम बदलणार कारण वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार…’ अशा कॅप्शनसह शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सुरुवातीला हा व्हिडिओ पाहून अनेक चाहत्यांना अंकिता खरंच हिंदी बिग बॉसमध्ये जाणार असे वाटले होते, ज्यामुळे त्यांची उत्सुकता वाढली होती. मात्र, हा प्रँक असल्याचे कळताच अनेकांची निराशा झाली. अनेकांनी ‘तुझं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल,’ अशा कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अंकिता वालावलकर ही एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून, ती ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – 

कर्करोगाच्या उपचारात क्रांती; रशियाने आणली नवीन ‘ही’ विशेष लस

ओबीसींच्या विरोधात जरांगेंच्या समर्थकाचा कोर्टात कॅव्हेट दाखल

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.