प्रसिद्ध युट्यूब आशिष चंचलानी ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? फोटोमुळे चर्चांना उधाण

Elli AvRam

Ashish Chanchlani – Elli AvRam Dating Rumours | प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानी (Ashish Chanchlani) सध्या चर्चेत आहे. आशिषने एका मुलीला उचलून घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो नक्की कोणाला डेट करतोय, याविषयी जोरदार चर्चा सुरू झाली. आशिष कोणासोबत रिलेशनमध्ये आहे? याची उत्सुकता चाहत्यांनी लागली.

आशिषने ज्या मुलीसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे की अभिनेत्री एली अवराम (Elli AvRam) आहे. हा फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखःद धक्का दिला. फोटोच्या कॅप्शनमध्ये फक्त ‘फायनली’ असा एकच शब्द होता, ज्याने त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवांना उधाण आले.

शेअर केलेल्या फोटोमध्ये आशिषने एली अवरामला उचलून घेताना दिसत आहे. यामध्ये आशिष हसताना आणि एली पुष्पगुच्छासह आनंदी दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये आशिषने एली अवरामला उचलून घेताना दिसत आहे. यामध्ये आशिष हसताना आणि एली पुष्पगुच्छासह आनंदी दिसत आहे.

तसेच, त्याने कॅप्शनमध्ये ‘फायनली’ लिहिल्याने सोशल मीडियावर दोघांच्या नात्याची अजूनच चर्चा रंगली. चाहते दोघांनाही सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

एली अवराम कोण?

एलीने ‘मिकी व्हायरस’, ‘किस किस को प्यार करू’ आणि ‘मलंग’सारख्या सिनेमांत काम केलं आहे. तिने मराठी सिनेमात ‘इलू इलू 1998’मध्येही झळकली. ती काही काळ हार्दिक पंड्यासोबत होती, पण नंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता आशिषसोबतच्या तिच्या नात्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.