Avatar 3: बहुप्रतिक्षित ‘अवतार: फायर अँड ॲश’चा ट्रेलर झाला लाँच, चित्रपट कधी होणार रिलीज? जाणून घ्या

Avatar: Fire and Ash Trailer

Avatar: Fire and Ash Trailer: जेम्स कॅमेरॉन यांच्या बहुप्रतिक्षित ‘अवतार: फायर अँड ॲश’ (Avatar: Fire and Ash Trailer) या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘फँटॅस्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स’ सोबत ट्रेलरचा प्रीमियर झाल्यानंतर काही तासांतच तो अनधिकृतपणे लीक झाल्यामुळे हा लवकर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘अवतार: फायर अँड ॲश’ हा कॅमेरॉनच्या अभूतपूर्व ‘अवतार’ चित्रपट सीरिजमधील तिसरा भाग आहे. याआधी ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ (Avatar: The Way of Water) आणि 2009 चा मूळ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

‘अवतार 3’ चा दमदार ट्रेलर

‘अवतार 3’, म्हणजेच ‘फायर अँड ॲश’च्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा पँडोराच्या (Pandora) समृद्ध आणि आकर्षक जगात परत आणले आहे. ट्रेलर जेक सलीचा मोठा मुलगा, लो’ॲक (Lo’ak) याच्यावर लक्ष केंद्रित करतो, जो समुद्रातील मेटकायिना जमातीच्या त्सियेराशी (Tsiyera) संवाद साधताना दिसतो.

ट्रेलरमध्ये कुटुंबातील तणावही अधोरेखित करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये फ्रेंचायझीचा नवीन विलन वरांग (Varang) आणि तिचे भयानक ॲश क्लॅन (Ash Clan) यांचीही झलक दाखवण्यात आली आहे.

‘अवतार: फायर अँड ॲश’ – कधी रिलीज होणार?

‘अवतार: फायर अँड ॲश’ हा चित्रपट 19 डिसेंबर 2025 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. तर फ्रेंचायझीमधील चौथे आणि पाचवे भाग अनुक्रमे 2029 आणि 2031 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या चित्रपटात सिगॉर्नी वीव्हर (Sigourney Weaver), स्टीफन लँग (Stephen Lang), मिशेल योह (Michelle Yeoh) आणि डेव्हिड थ्युलिस (David Thewlis) यांसारख्या कलाकारांची मुख्य भूमिका आहे.