‘बिग बॉस’ येतोय! 24 ऑगस्टपासून पाहता येणार शो; , ‘हे’ स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता

Bigg Boss 19 Premiere Dat

Bigg Boss 19 Premiere Date: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss 19 Premiere Date) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परत येत आहे. अभिनेता सलमान खान (Salman Khan) च्या या शोचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात “घरवालों की सरकार” ही नवीन संकल्पना दाखवण्यात आली आहे.

यामध्ये आता बिग बॉससोबतच घरातील सर्व स्पर्धक मिळून महत्त्वाचे निर्णय घेतील या बदलामुळे बिग बॉस 19 मध्ये रंजक वळणं पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टीझर आणि लोगो

टीझरमध्ये सलमान खान राजकारण्याच्या वेशात दिसत असून, स्पर्धकांच्या मताने शो चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. शोचा नवा लोगो देखील समोर आला आहे.

शोची सुरुवात

‘बिग बॉस 19’ ची सुरुवात 24 ऑगस्ट 2025 पासून होईल. हा शो जिओ हॉटस्टार आणि कलर्स टीव्हीवर पाहता येणार आहे. स्पर्धकांची अंतिम यादी अजून जाहीर झाली नाही, पण टीव्ही आणि डिजिटल स्टार्ससह काही जोडपी आणि सोशल मीडिया प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यता आहे.

संभाव्य स्पर्धक

शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा असलेल्या सेलिब्रिटींमध्ये राम कपूर, मुनमुन दत्ता, फैजल शेख, द रिबेल किड, पूरब झा, गौतमी कपूर आणि धीरज धूपर यांचा समावेश आहे. स्पर्धकांची अधिकृत नावं अद्याप समोर आलेली नाहीत. मात्र, या नावांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.