गायक हिमेश रेशमिया आता जागतिक स्तरावर, ‘या’ लिस्टमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय कलाकार.

Himesh Reshammiya in Bloomberg Pop Power List

Himesh Reshammiya in Bloomberg Pop Power List: गायक आणि संगीतकार हिमेश रेशमियाची ((Himesh Reshammiya) गाणी आजही आवडीने ऐकली जातात. त्याच्या ‘तेरा सुरूर’, ‘झलक दिखला जा’, ‘हुक्का बार’पर्यंत अनेक गाणी आजही लोकं गुणगुणतात. गेल्या दोन दशकांपासून अनेक हिट गाणी देणाऱ्या हिमेश रेशमियाने मोठी कामगिरी केली आहे.

हिमेश रेशमियाने आता ब्लूमबर्गच्या (Himesh Reshammiya in Bloomberg Pop Power List) ‘पॉप पॉवर लिस्ट’मध्ये (Pop Power List) स्थान मिळवले आहे. या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय कलाकार बनला आहे.

ब्लूमबर्गच्या यादीत 22 वे स्थान

ब्लूमबर्गने जगातील सर्वात प्रभावशाली पॉप स्टार्सची क्रमवारी जाहीर केली आहे. या यादीत पोस्ट मालोन, बील, ब्रुनो मार्स आणि बियॉन्से यांनी पहिले चार क्रमांक पटकावले आहेत. तर, हिमेश रेशमिया 22 व्या स्थानावर आहे.

ब्लूमबर्गच्या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय कलाकार आहेत. या यादीत बिली आयलिश, सबरीना कारपेंटर, जे-होप, कोल्डप्ले, एड शीरन, बॅड बनी, लेडी गागा, कॅटसेई आणि शकीरा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचाही समावेश आहे.

या यशानंतर हिमेश रेशमियाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार मानले.

दरम्यान, गेल्या महिन्यात हिमेश रेशमियाने ‘सारेगामा लाईव्हच्या कॅपमनिया दिल्ली’ कार्यक्रमात हजारो चाहत्यांसमोर आपली गाणी सादर केली होती. ‘तेरा सुरूर’, ‘झलक दिखला जा’, ‘हुक्का बार’ आणि ‘आशिकी में तेरी’ यांसारखी गाणी त्याने गायली होती कामाबद्दल बोलायचे झाल्यास, हिमेश रेशमिया नुकताच ‘बॅडॅस रवी कुमार’ या चित्रपटात दिसला होता.