Housefull 5 Collection | अभिनेता अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) काल (6 जून) देशभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे, या चित्रपटाला ‘हाऊसफुल 5A’ आणि ‘हाऊसफुल 5B’ असे दोन पर्यायी शेवटआहेत, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
रिपोर्टनुसार, ‘हाऊसफुल 5’ ने (Housefull 5 Box Office Collection) पहिल्याच दिवशी भारतात 23 कोटी रुपये निव्वळ कमाई करून धमाकेदार सुरुवात केली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल 4’ च्या पहिल्या दिवसाच्या (19.08 कोटी रुपये) कमाईला मागे टाकत, ‘हाऊसफुल 5’ या फ्रँचायझीमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या चित्रपटाने अक्षय कुमारच्या जानेवारीमध्ये आलेल्या ‘स्काय फोर्स’ (11.50 कोटी) आणि गेल्या वर्षीच्या हिट ‘फायटर’लाही ( 22.50 कोटी) पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये मागे टाकले आहे. मात्र, या वर्षी 2025 मधील इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘हाऊसफुल 5’ च्या सकाळच्या शोमध्ये (Morning Shows) 55 टक्के कमी प्रेक्षक होते, तरीही तो टॉप 10 मधील पहिल्या 5 चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
विकी कौशलचा ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट 30.5 टक्के सकाळच्या ऑक्युपन्सीसह (Occupancy) 2025 मधील सर्वात मोठा बॉलिवूड हिट ठरला आहे.
दरम्यान, साजिद नाडियादवाला यांच्या नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत बनलेल्या या चित्रपटात रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस यांसारख्या मोठ्या कलाकारांचा समावेश आहे.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित या चित्रपटाचे कथानक एका आलिशान क्रूझ शिपवर आधारित आहे. एका अब्जाधीशाने आपला वारसदार ‘जॉली’ असेल अशी घोषणा केल्यानंतर लगेचच जहाजावर एक खून होतो. या खुनाचे गूढ उकलण्यासाठी अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि अभिषेक बच्चन यांनी साकारलेल्या ‘जॉली’ नावाच्या तीन व्यक्ती आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्सवर संशय येतो, असे मजेशीर कथानक या चित्रपटात आहे.