चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानचा कमबॅक,’Jewel Thief’ नेटफ्लिक्सवर रिलीज

Jewel Thief – The Heist Begins Movie | वांद्र्यातील घरी झालेल्या चाकू हल्ल्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याचा नवा नेटफ्लिक्स (Netflix) चित्रपट ‘ज्वेल थीफ – द हेस्ट बिगिन्स’ (Jewel Thief – The Heist Begins) आज (25 एप्रिल) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सैफ अली खानचा हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध झाला आहे. या चित्रपटामुळे सैफ पुन्हा चर्चेत आला आहे.

‘सेक्रेड गेम्स’ नंतर पुन्हा नेटफ्लिक्सवर कमबॅक

2018 मधील गाजलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games) या वेब सीरिजनंतर सैफ पहिल्यांदाच नेटफ्लिक्ससोबत काम करत आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा प्रचंड वाढलेल्या असताना, ‘ज्वेल थीफ’ ट्रेलर, गाणी आणि स्टारकास्टमुळे प्रचंड चर्चेत आहे.

काय आहे कथानक?

चित्रपटात सैफ एका हुशार चोराची भूमिका साकारत आहे. तो ‘रेड सन’ नावाच्या आफ्रिकेतील अतिशय मौल्यवान हिऱ्याची चोरी करण्यासाठी मिशनवर जातो. मात्र ही चोरी नंतर एका धोकादायक खेळात बदलते. दुसरीकडे त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राजन त्याच्या मार्गात अडथळा ठरतो. हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. हा चित्रपट जवळपास 1 तास 56 मिनिटांचा आहे.

Jewel Thief – The Heist Begins मधील कलाकार:

या चित्रपटात सैफ अली खान रेहान रॉयच्या भूमिकेत आणि जयदीप अहलावत राजन औलखच्या भूमिकेत आहेत, जे एका मौल्यवान हिऱ्याची चोरी करण्याची योजना आखतात. निकिता दत्ता फरहाची भूमिका साकारत आहे, जी जयदीपची पत्नी आहे. ‘ज्वेल थीफ – द हेस्ट बिगिन्स’ मध्ये कुणाल कपूर विक्रम पटेल या पोलिसाच्या भूमिकेत देखील आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूरर्वी सैफवर त्याच्या राहत्या घरी चाकूने हल्ला झाला होता. त्यानंतर या नव्या चित्रपटासोबत सैफ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाद्वारे चाहत्यांना एक हटके थ्रिलर अनुभवायला मिळणार आहे.

Share:

More Posts