Kartik Aaryan: अलिबाग हे आता केवळ सुट्ट्या घालवण्याचे ठिकाण राहिलेले नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी गुंतवणुकीचे हब बनत आहे. या यादीत आता अभिनेता कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) नावही जोडले गेले आहे. आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा (Celebrity Real Estate) विस्तार करत कार्तिकने पहिल्यांदाच जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याने ‘द हाऊस ऑफ अभिनंदान लोढा’ (HoABL) च्या ‘शॅटो डी अलिबाग’ या प्रकल्पात 2,000 चौरस फूट जमीन 2 कोटी रुपयांना विकत घेतली आहे, जिथे तो स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत आहे. याबाबत हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिले आहे.
अमिताभ आणि क्रिती सेनॉन होणार कार्तिकचे नवे शेजारी
अलिबाग हे मुंबईजवळ असल्याने गुंतवणूक करण्यासाठी एक उत्तम ठिकाण बनले आहे, असे कार्तिक आर्यनने म्हटले आहे. तो म्हणाला, “अलिबाग आज गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगल्या ठिकाणांपैकी एक आहे. मी येथे माझे स्वतःचे घर बांधण्याचा विचार करत आहे. अभिनंदान लोढा यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी पहिल्यांदाच जमिनीमध्ये गुंतवणूक केली आहे.”
यापूर्वी 2024 मध्ये अमिताभ बच्चन यांनीही HoABL कडून अलिबागमध्ये 10,000 चौरस फूट जमीन 10 कोटी रुपयांना खरेदी केली होती. त्यानंतर क्रिती सेनननेही ‘सोल डी अलिबाग’ या प्रकल्पात 2,000 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे.
HoABL चे अध्यक्ष अभिनंदन लोढा यांनी सांगितले की, “कार्तिकची ही गुंतवणूक दर्शवते की मुंबईकरांसाठी अलिबाग हे आलिशान घर बांधण्यासाठी एक पसंतीचे ठिकाण बनत आहे.”
अलिबागचा रिअल इस्टेट मार्केट आणि कार्तिकच्या इतर मालमत्ता
अलिबाग हे अनेक बॉलिवूड कलाकारांसाठी, खेळाडूंसाठी आणि उद्योजकांसाठी ‘सेकंड होम’ चे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे (MTHL) अलिबागला जाणे आता अधिक सोपे झाले आहे.
कार्तिक आर्यनच्या रियल इस्टेट पोर्टफोलिओबद्दल बोलायचे झाल्यास, 2024 मध्ये त्याने जुहू येथील एका अपार्टमेंटमध्ये 4.5 लाख रुपये प्रति महिना भाड्याने राहायला सुरुवात केली होती. तसेच, 2023 मध्ये त्याने मुंबईत 17.50 कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट खरेदी केले होते.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
कामगार कायद्यात मोठा बदल: महाराष्ट्रात आता रोज 12 तास कामाची परवानगी; जाणून घ्या नवे नियम
जीएसटीचे 2 स्लॅब रद्द! कोणत्या वस्तू स्वस्त-कोणत्या वस्तू महाग झाल्या, पाहा संपूर्ण यादी