Home / मनोरंजन / परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या घरी चिमुकला पाहुणा येणार; प्रियांका चोप्राने दिल्या खास शुभेच्छा

parineeti chopra pregnancy

Parineeti Chopra pregnancy: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra pregnancy) आणि आप नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच आई-वडील होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली.

परिणीतीने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिल्यानंतर आता तिच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) लवकरच मावशी होणार असून, तिनेही या जोडप्याला सोशल मीडियावर खास शुभेच्छा दिल्या आहेत.

परिणीती-राघवची खास पोस्ट

रिणीती आणि राघवने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर करून ही गोड बातमी जाहीर केली. त्यांनी शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये एक पांढरा आणि सोनेरी रंगाचा केक दिसत आहे, ज्यावर ‘1+1=3’ असे लिहिलेले आहे. त्यावर चिमुकल्या पावलांचे ठसेही डिझाइन केलेले आहेत.

दुसऱ्या स्लाइडमध्ये, लवकरच पालक होणारे हे जोडपे हातात हात घालून बागेत फिरताना दिसत आहेत. या फोटोंसोबत त्यांनी ‘आपले छोटेसे विश्व… येत आहे. खूप धन्य झालो आहोत,’ असे भावनिक कॅप्शन लिहिले आहे.

प्रियांका चोप्राने दिल्या शुभेच्छा

परिणीती-राघवच्या या पोस्टनंतर प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्यांना टॅग करत ‘अभिनंदन’ असे लिहिले. तिने त्यांच्या पोस्टवरही हीच कमेंट केली.

तिच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनन्या पांडे, भूमी पेडणेकर, रकुल प्रीत, नेहा धुपिया आणि मसाबा गुप्ता यांनीही कमेंट करत आनंद व्यक्त केला आहे.

दरम्यान, परिणीती आणि राघव चढ्ढा यांनी मे 2023 मध्ये दिल्लीत साखरपुडा केला होता, तर सप्टेंबरमध्ये उदयपूरमध्ये त्यांनी शाही पद्धतीने लग्न केले.

कामाबद्दल सांगायचे तर परिणीती शेवटची अमर सिंग चमकीला या चित्रपटात दिसली होती, ज्यात तिच्यासोबत दिलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत होता. आता ती एका नेटफ्लिक्स मिस्ट्री थ्रिलरमधून ओटीटी (OTT) मध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेंसिल डिसिल्वा करत आहेत.


हे देखील वाचा-

“दबाव कितीही आला तरी…”, अमेरिकेच्या आयात शुल्कावर पीएम मोदींचा थेट इशारा

मंत्री शिरसाट यांच्या विरोधात पुरावे रोहित पवारांनी राजीनामा मागितला

सिंहगडावर बेपत्ता तरुण पाच दिवसांनी सापडला