Raj Kundra Shilpa Shetty Notice : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यावर ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात व्यावसायिक दीपक कोठारी (Deepak Kothari) यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (Mumbai Police Economic Offences Wing) गुन्हा दाखल केला. ते दोघे विदेशात पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध लुकआउट नोटीस (Lookout Notice) जारी केली आहे. त्यामुळे आता दोघांनाही देशाबाहेर जाता येणार नाही.
व्यावसायिक दीपक कोठारी यांच्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ या कालावधीत शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्या बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ६० कोटी ४८ लाख रुपये गुंतवले होते. कंपनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म म्हणून कार्यरत होती. एप्रिल २०१६ मध्ये शिल्पा शेट्टीने स्वतः पैसे परत करण्याची हमी दिली होती. मात्र काही महिन्यांतच तिने संचालकपदाचा राजीनामा दिला आणि कंपनी दिवाळखोरीत निघाली. पैसे मागितल्यावर वेळोवेळी टाळाटाळ केली. तब्बल नऊ वर्षांनंतरही गुंतवलेले पैसे परत मिळाले नाहीत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
अजित पवार सलग तिसऱ्यांदा जीएसटी बैठकीला गैरहजर