सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा आता अभिनयात; ‘या’ जाहिरातीमुळे झाला सोशल मीडियावर व्हायरल

Salman Khan Bodyguard Viral Video

Salman Khan Bodyguard Viral Video: बॉलिवूड अभिनेता सलमान खानसोबत दिसणारा त्याचा बॉडीगार्ड शेरा (Shera) हा देखील त्याच्याप्रमाणेच लोकप्रिय आहे. सलमानसोबत दिसणारा शेरा आता पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात उतरला आहे. एका डिलिव्हरी ॲपच्या रक्षाबंधन कॅम्पेनअंतर्गत (Rakshabandhan Campaign) त्याने अभिनयात पदार्पण केले आहे.

त्याच्या या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Salman Khan Bodyguard Viral Video) खूप व्हायरल होत आहे आणि लोकांना त्याचा हा दमदार अंदाज खूप आवडत आहे.

रक्षाबंधनच्या जाहिरातीत दिसला शेराचा दमदार अंदाज

इंस्टामार्टच्यानवीन रक्षाबंधन जाहिरातीत शेरा अनेक अडचणीत सापडलेल्या किंवा गरजू महिलांसाठी ‘भावा’ची भूमिका बजावताना दिसत आहे. तो पावसात एका महिलेला ऑटो मिळवून देण्यास मदत करतो, तर कधी एका महिलेला त्रास देणाऱ्या सहकाऱ्यापासून वाचवतो.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच शेरा एका डिलिव्हरी करणाऱ्या मुलाच्या स्कूटरवर घाईघाईत बसून म्हणतो, “भाऊ, फक्त 10 मिनिटांत आलो.” यानंतर तो पावसात ऑटोची वाट पाहणाऱ्या महिलेला मदत करतो आणि म्हणतो, “मी शेरा, भाईचा बॉडीगार्ड, रक्षण करतो. त्यामुळे प्रत्येक रक्षाबंधनला ज्यांना भाऊ नसतात, त्या मला आपला भाऊ मानतात. यांनी मला भाऊ मानले, मी माझे कर्तव्य बजावले. तुम्ही तर आधीच भाऊ-बहिण आहात, तुमचे कर्तव्य बजावा. इंस्टामार्टवरून राखी आणि भेटवस्तू मागवा, फक्त 10 मिनिटांत.”

ही जाहिरात रक्षाबंधनच्या काही दिवस आधी रिलीज झाली असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोट्यावधीचा मालक आहे शेरा

शेराचे खरे नाव गुरमीत सिंह जॉली (Gurmeet Singh Jolly) आहे. 1995 पासून तो सलमान खानचा खास बॉडीगार्ड आणि सुरक्षा प्रमुख म्हणून काम करत आहे.

‘टायगर सिक्युरिटी’ (Tiger Security) नावाच्या एका सुरक्षा कंपनीचा तो मालकही आहे, जी अनेक वर्षांपासून अनेक प्रसिद्ध व्यक्तींना सुरक्षा पुरवते.

एक काळचा बॉडीबिल्डर असलेला शेरा 1987 मध्ये ‘मुंबई ज्युनिअर’ चा विजेता होता. 1988 मध्ये ‘मिस्टर महाराष्ट्र ज्युनिअर’ मध्ये तो उपविजेता ठरला होता. रिपोर्ट्सनुसार, आज शेराची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सलमान त्याला दरमहा 15 लाख रुपये पगार देतो, जो वार्षिक 2 कोटी रुपयांच्या आसपास जातो.