Samay Raina India Tour: ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादानंतर समय रैनाचा कमबॅक, ‘या’ शहरांमध्ये करणार शो

Samay Raina India Tour

Samay Raina India Tour: प्रसिद्ध युट्यूबर आणि स्टँड-अप कॉमेडियन समय रैनासाठी (Samay Raina India Tour) वर्षाची सुरुवात 2025 ची वादग्रस्त ठरली होती. त्यांचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ युट्यूबवर गाजला, पण एका भागामुळे मोठा गदारोळ झाला. यात रणवीर अलाहाबादियाने पालकांबाबत केलेल्या तक्रारीनंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

या वादग्रस्त शो नंतर त्याच्यासह शोमधील इतरांविरोधात अनेक राज्यांत त्यांच्यावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. या वादामुळे त्यांनी दौरे रद्द केले होते. मात्र, आता समय रैना पुन्हा एकदा भारतात शो (Samay Raina India Tour) करणार आहे.

या वादानंतर समय रैनाने परदेशात कार्यक्रम सुरू केले होते. भारतातील चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. अखे रसमय रैनाने भारत दौऱ्याची घोषणा केली आहे.

अनेक शहरात होणा शो

समय रैनाने इंस्टाग्रामवर आपल्या शो ची माहिती दिली. त्याने या टूरला “समय रैना: स्टिल अलाइव एंड अनफिल्टर्ड’ असे नाव दिले आहे.

त्याने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “समय रैना: स्टिल अलाइव एंड अनफिल्टर्ड’ इंडिया टूर लाईव्ह आता.” या दौऱ्यात 16 कार्यक्रम होणार आहेत. बेंगळूरू, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि दिल्ली येथे हे कार्यक्रम होतील. 15 ते 17 ऑगस्ट बेंगळूरू, 23 ते 24 ऑगस्ट हैदराबाद, 30 ऑगस्ट मुंबई, 6 ते 7 सप्टेंबर कोलकाता, 19 ते 20 सप्टेंबर चेन्नई, 26 ते 28 सप्टेंबर पुणे आणि 2 ते 5 ऑक्टोबर दिल्ली येथे कार्यक्रम असतील. समय रैनाच्या या या घोषणेनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.

Share:

More Posts