Sara Tendulkar Dating Siddhant Chaturvedi Rumours | दिग्गज क्रिकेटपूट सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा कधी तिच्या फोटोंमुळे, कधी पोस्टमुळे तर कधी तिच्या कथित रिलेशनशिपमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा साराचे नाव आणखी एका व्यक्तीशी जोडले गेले आहे.
यापूर्वी साराचे नाव क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत जोडले जात होते. मात्र, आता फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार, सारा तेंडुलकर बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीला (Siddhant Chaturvedi) डेट करत असल्याची चर्चा आहे. सारा आणि सिद्धांत अनेकवेळा एकत्र दिसले आहेत. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर हे बी-टाऊनमधील नवीन जोडपे असू शकतात, असा अंदाज बांधला जात आहे.
रिपोर्टनुसार, सारा आणि सिद्धांत सध्या त्यांचे नाते लोकांच्या नजरेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोघांनीही याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही, मात्र त्यांच्यातील जवळीक वाढल्याचे बोलले जात आहे.
सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तर सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. यापूर्वी साराचे नाव शुभमन गिलसोबत जोडले गेले होते. मात्र, दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता साराचे नाव सिद्धांतसोबत जोडले जात असल्याने या चर्चांना नवीन वळण मिळाले आहे.
सिद्धांत चतुर्वेदीचे यापूर्वी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदासोबतही नाव जोडले गेले होते. मात्र, आता सारासोबतच्या त्याच्या कथित रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.