Home / मनोरंजन / शाहरुख खानने त्याचा ‘मन्नत’ बंगला विकायला काढला तर किती कोटी मिळतील? जाणून घ्या

शाहरुख खानने त्याचा ‘मन्नत’ बंगला विकायला काढला तर किती कोटी मिळतील? जाणून घ्या

Shah Rukh Khan Mannat Bungalow

Shah Rukh Khan Mannat Bungalow: मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांची यादी काढली तर त्यात शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘मन्नत’ बंगल्याचा देखील समावेश करावा लागेल. मुंबईत येणारा प्रत्येक सिनेप्रेमी ‘मन्नत’ बंगला पाहायला नक्कीच जातो. सध्या शाहरूखच्या घराचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे.

शाहरूखने 2001 मध्ये हा बंगला खरेदी केला होता. समजा, त्याने आज हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला तर किती पैसे मिळतील माहितीये का? याबाबत जाणून घेऊया.

13 कोटींना खरेदी केला होता बंगला

2001 मध्ये शाहरुख खानने सुमारे 13 कोटी रुपयांना हा बंगला खरेदी केला होता. ‘द इनर वर्ल्ड ऑफ शाहरुख खान’ (The Inner World of Shah Rukh Khan) या 2005 च्या डॉक्युमेंट्रीमध्ये अभिनेत्याने ‘मन्नत’चे महत्त्व सांगितले होते.

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक असलेल्या शाहरुखसाठी हा बंगला खूप महत्त्वाचा आहे. त्याने अनेकवेळा म्हटले आहे की भावनिक संबंधामुळे तो ‘मन्नत’ कधीही विकणार नाही. पण, जर त्याने 27,000 स्क्वेअर फूटचा हा बंगला विकण्याचा विचार केला, तर आज त्याला किती किंमत मिळेल?

हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या बंगल्याची आता किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. म्हणजे हा बंगला 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकला जाऊ शकतो.

‘मन्नत’चा ऐतिहासिक प्रवास

1914 मध्ये बांधलेल्या ‘मन्नत’चे मूळ नाव ‘व्हिला व्हिएन्ना’ होते. शाहरुखने 2001 मध्ये बाई खोरशेद भानू संजना ट्रस्टकडून हा बंगला खरेदी केला होता आणि सुरुवातीला त्याचे नाव ‘जन्नत’ (Jannat) ठेवले होते. पण नंतर तो खूप भाग्यवान ठरल्यामुळे 2005 मध्ये त्याचे नाव ‘मन्नत’ ठेवण्यात आले. आज ‘मन्नत’ फक्त एक घर नसून एक पर्यटन स्थळ बनले आहे.

‘मन्नत’ला ग्रेड-III हेरिटेज मालमत्तेचा दर्जा मिळाला आहे. याचा अर्थ मूळ बंगल्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. पण शाहरुखने मुख्य इमारतीच्या मागे सहा मजली ॲनेक्स जोडून त्याचा विस्तार केला आहे.

ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

आता लोकसभा निवडणुका झाल्या तर भाजप-काँग्रेसला किती जागा मिळणार? सर्वेक्षणातून समोर आले आकडे

Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान

विरारमध्ये इमारत कोसळली! १७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी