Home / मनोरंजन / SSMB 29 Movie: तब्बल 120 देशात रिलीज होणार एस.एस. राजामौली यांचा नवीन चित्रपट, बजेट ऐकून थक्क व्हाल

SSMB 29 Movie: तब्बल 120 देशात रिलीज होणार एस.एस. राजामौली यांचा नवीन चित्रपट, बजेट ऐकून थक्क व्हाल

SSMB 29 Movie

SSMB 29 Movie: दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट SSMB 29 सध्या चर्चेत आहे. यात महेश बाबू मुख्य भूमिकेत असून, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

नुकतेच, चित्रपटाच्या टीमने केनियामध्ये शूटिंगचा एक शेड्यूल पूर्ण केले, ज्यात केनिया येथील पंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मुसलिया मुदावडी यांनी टीमसोबत घालवलेल्या वेळेबद्दल सांगितले.

बजेट आणि इतर माहिती

केनियाच्या एका पोर्टलने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजामौली यांनी मुसलिया मुदावडी यांची SSMB 29 च्या शूटिंगनंतर भेट घेतली. या रिपोर्टमध्ये चित्रपटाचे बजेट 135 दशलक्ष डॉलर (जवळपास 1188 कोटी रुपये) असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या चित्रपटाला ‘आशियाई सिनेमाच्या इतिहासातील सर्वात मोठे चित्रपट निर्मिती’ असे म्हटले जात आहे. याआधी, जुलैमध्ये द सिटीजन या आणखी एका पोर्टलने चित्रपटाचे बजेट 116 दशलक्ष डॉलर (1022 कोटी रुपये) असल्याचे म्हटले होते. हा चित्रपट एकच असेल की दोन भागांमध्ये प्रदर्शित होईल, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

नुकतेच चित्रपटातील आफ्रिकेमधील मुख्य सीन्स केनियामध्ये, विशेषतः मासाई मारा, लेक नैवाशा, सांबुरू, माउंट किलीमांजारो आणि अम्बोसेली या ठिकाणी शूट झाले आहेत. हा चित्रपट 120 देशांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. राजामौली यांनी 9 ऑगस्ट रोजी महेश बाबू यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्टर जारी करून, चित्रपटाबद्दल अधिक माहिती नोव्हेंबरमध्ये जाहीर केली जाईल, असे सांगितले होते.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – GST कपातीचा ग्राहकांना फायदा; टाटा मोटर्सच्या गाड्यांच्या किमतीत मोठी घट