Tamannaah Bhatia on Dating Rumors With Virat Kohli : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) अनेकदा तिच्या लव्ह लाईफमुळे (Love Life) चर्चेत असते. तमन्नाने आपल्या कामाद्वारे बॉलिवूडसह दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच तिने विजय वर्मासोबतचे दोन वर्षांपासून असलेले नाते संपवून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
आता याचदरम्यान, तमन्नाने एका मुलाखतीत विराट कोहली (Virat Kohli) सोबतच्या नात्याबद्दल आणि एका पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबतच्या जवळीकीबद्दल खुलासा केला आहे.एकेकाळी तम्ननाचे नाव विराट कोहली आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकसोबत जोडले गेले होते. आता तिने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केले.
तमन्ना म्हणाली की, “मी विराट कोहलीला फक्त एकदाच भेटले होते आणि त्यानंतर आमच्या ‘डेटिंग’च्या बातम्या सुरू झाल्या. या अफवा ऐकून मला खूप वाईट वाटले होते. आम्ही एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान फक्त एकदाच भेटलो होतो. त्यानंतर आम्ही कधीच भेटलो नाही.”
पाकिस्तानच्या क्रिकेटरसोबतच्या नात्याबद्दलही खुलासा
तमन्ना भाटियाची पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाक (Abdul Razzaq) सोबतचा एक फोटो व्हायरल (Viral) झाला होती, ज्यात ते दोघे एका ज्वेलरी स्टोअरच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. यावर पहिल्यांदाच बोलताना तमन्ना म्हणाली, “इंटरनेटनुसार, मी काही काळ रज्जाकसोबत विवाहित होते. सर, माफ करा, पण तुम्हाला मुले आहेत आणि मी तुम्हाला ओळखतही नाही.”
या सुरुवातीच्या अफवांमुळे आपल्याला त्रास झाला होता, पण आता मी त्याकडे लक्ष देत नाही, असेही तमन्नाने सांगितले. “आपण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कधीकधी लोक माझ्याबद्दल काय विचार करतात, हे जाणून घेण्यासाठी मी स्वतःला गुगलवर शोधते,” असेही तिने मुलाखतीत सांगितले.