Actor Achyut Potdar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार (Achyut Potdar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 91 व्या वर्षी ठाणे येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Actor Achyut Potdar Passes Away)
त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, रिपोर्टनुसार, वयोमानानुसार येणाऱ्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली आहे.
अच्युत पोतदार यांना ‘3 Idiots’या लोकप्रिय चित्रपटातील भूमिकेमुळे देशभरात ओळख मिळाली. यात त्यांनी एका प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचा ‘कहना क्या चाहते हो?’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्यांचे अनेक मीम्स आजही सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहेत.
सेवानिवृत्तीनंतर अभिनय क्षेत्राची सुरुवात
अच्युत पोतदार यांनी वयाच्या 44 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याआधी त्यांनी भारतीय सैन्य दल आणि इंडियन ऑइल कंपनीमध्ये काम केले होते.
त्यांनी 125 हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये तसेच 100 हून अधिक टीव्ही मालिकांमध्ये काम केले. ‘3 Idiots’ सोबतच त्यांनी ‘लगान’, ‘सुलतान’, ‘दबंग 2’ (Dabangg 2), ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator), ‘वागले की दुनिया’ यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.
हे देखील वाचा –
राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट
अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ‘ही’ खास भेटवस्तू
इतिहास परतला! सरदार रघुजी भोसले यांची 18 व्या शतकातील तलवार लंडनहून महाराष्ट्रात दाखल