Home / News / अमेरिकेत वादळामुळे १६ लोकांचा मृत्यू

अमेरिकेत वादळामुळे १६ लोकांचा मृत्यू

अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागात आलेल्या वादळामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एकट्या टेनेसीमधील १० जणांचा समावेश आहे. मध्य...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य-पश्चिम भागात आलेल्या वादळामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये एकट्या टेनेसीमधील १० जणांचा समावेश आहे.

मध्य अमेरिकेत गेल काही मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे नद्या वेगाने वाहत असून टेक्सास ते ओहायो पर्यंत अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीत वाढ झाली. केंटकी आणि मिसिसिपीमधील अनेक काऊन्टींसाठी पुराचा इशारा जारी करण्यात आला होता. येत्या काही दिवसांत हवामान आणखी बिघडू शकते, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अलाबामा आणि मिसिसिपी येथे नवीन चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे. अनेक सरकारी एजन्सी पूरात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. चक्रीवादळाने मोठे नुकसान केल्याचे सांगितले जात आहे.

Web Title:
संबंधित बातम्या