नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या महसूल विभागाने उकड्या तांदळावरील निर्यात कर २० टक्क्यांवरून कमी करून १० टक्क्यांवर आणला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे उकडा तांदूळ स्वस्त होणार आहे. त्याचबरोबर पांढऱ्या तांदूळावरील निर्यात कर रद्द केला आहे . यासंबंधीची अधीसूचना काल महसूल विभागाने जारी केली असून कालपासून हा निर्णय लागू झाला आहे.
