नाशिक- नाशिकमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने येत्या २२ एप्रिलपर्यंत नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.काल गुरुवारी नाशिकचा पारा ४१ अंशांवर स्थिरावला होता.
नाशिकमधील हे वाढते तापमान पुढील आठवड्यात कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर डाॅक्टरांनी आवाहन केले आहे की नागरिकांनी घरातून बाहेर पडताना पुरेशी दक्षता बाळगावी. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे. पुरेसे पाणी आणि लिंबाचा रस सेवन करावा.२० एप्रिलपर्यंत नाशिकचे कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत स्थिर राहणार आहे.