मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ सदस्यीय पथक गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर असे तीन दिवस हे पथक महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. काल या पथकाने झारखंडमध्ये निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला होता. झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर हे पथक या दोन राज्यांत आढावा घेत आहे.या तीन दिवसांच्या दौऱ्यात हे पथक राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी मतदान प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चाही करणार आहे, हे काम पूर्ण झाल्यानंतर कधीही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
