पालेभाज्यांचे भाव गडगडले

चाकण :
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये डांगर भोपळा, काकडी, कांदा व लसणाची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत. जनावरांच्या बाजारात जर्सी गाय व बैल यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. एकूण उलाढाल ४ कोटी, ८० लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक १,१०० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक २०० क्विंटलने वाढली. कांद्याचा कमाल भाव ४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक २,२२५ क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ४७५ क्विंटलने वाढली. बटाट्याचा कमाल भाव ३,००० रुपयांवरून ३,१०० रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ३० क्विंटल झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक ५ क्विंटलने वाढली. लसणाचा कमाल भाव २८,००० रुपयांवर स्थिरावला. हिरव्या मिरचीची एकूण आवक ३३५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३ हजार ५०० रुपयांपासून ते ४ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.