फडणवीस २१ जुलैलासोलापूर दौऱ्यावर

मुंबई -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ जुलै रोजी सोलापूर दौऱ्यावर जाणार आहे. सोलापुरातील अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रसादगृहाच्या भूमिपूजन सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. अक्कलकोटमध्ये अन्नछत्र मंडळातर्फे स्वामी भक्तांसाठी १ लाख १९ हजार चौरस फुटांच्या भव्य महाप्रसादगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी याबाबतची माहिती दिली.