शेअर बाजार वाढीसह बंद दोन्ही निर्देशांकांमध्ये तेजी

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजार आज वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २८७ अंकांच्या वाढीसह ७७,०२१ अंकावर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १०४ अंकांनी वाढून २३,४३३ अंकांवर बंद झाला.आज सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांमध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली.तर वाहननिर्मिती, औषधनिर्मिती क्षेत्रांतील समभागांमध्ये विक्री दिसून आली. धातू, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांसह स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकही तेजीसह बंद झाले.