सोमवारपासून सांगलीत संत बाळूमामांची यात्रा

सांगली – शहरातील माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर येथे असलेल्या संत बाळूमामा मंदिरात सोमवार २१ एप्रिलपासून भव्य यात्रा सुरू होणार आहे. २७ एप्रिलपर्यंत चालणार्‍या या यात्रोत्सवात दररोज पारायण, भजन यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
गेल्या १८ वर्षांपासुन शिवोदयनगर येथील बाळूमामा मंदिरात यात्रा भरत आहे. सांगली जिल्ह्यातील मोठ्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. वर्षभर याठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. प्रत्येकवर्षी चैत्र आमावस्येला यात्रा भरविण्याची परंपरा आहे. यंदा सोमवारी ज्ञानेश्वरी पारायणाने यात्रेस सुरुवात होईल. २१ ते २४ एप्रिलपर्यंत दररोज पारायण, भजन, बाळूमामा ग्रंथवाचन असे कार्यक्रम होणार आहेत. २५ एप्रिल रोजी पालखी सोहळा पार पडणार आहे. २६ एप्रिलला पुरणपोळी नैवेद्य, होमहवन,
दीपोत्सव, महाप्रसाद वाटप आणि २७ एप्रिल रोजी पारायण समाप्ती,
आरती, रक्तदान शिबीर आणि गुरूवर्य विशाल घागरे यांच्या जागराने यात्रेचा समारोप होणार आहे.