Home / News / ‘अट्टम’ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटमराठी चित्रपटांत ‘वाळवी’ सरस

‘अट्टम’ सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटमराठी चित्रपटांत ‘वाळवी’ सरस

नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.मल्याळी भाषेतील ‘अट्टम’ या चित्रपटाला यंदाचा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – भारतीय चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान असलेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.मल्याळी भाषेतील ‘अट्टम’ या चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एकर्षी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.मराठी भाषेत ‘वाळवी’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार पटकावला.कांतारासाठी ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता,नित्या मेनन (थिरुचित्रंबलम)आणि मनसी पारेख (कच्छ एक्स्प्रेस ) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, प्रशांत नील याच्या केजीएफ ला दोन पुरस्कार, ब्रम्हास्त्रसाठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, अरजीत सिंगला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक, बॉम्बे जयश्री (सऊदी वेलाक्का) सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (उँचाई) यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तर पवन राज मल्होत्रा याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार जाहीर झाला.

Web Title:
संबंधित बातम्या