मुंबई – अदानी घोटाळ्यावरुन खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी ईडी कार्यालयाजवळ बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना रोखल्याने गोंधळ उडाला. या कार्यकर्त्यांनी “अदानी घोटाळ्याची ईडी चौकशी करावी, अशा जोरदार घोषणा देत ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला.
या आंदोलनात खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी रस्त्यावर उतरले आहे. अदानी समूहाने शेअरच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली आहेत. लोकांची आर्थिक लूट थांबली पाहिजे. मात्र याप्रकरणी ईडीने अदानीला क्लीनचीट दिली. याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी आमचे जबाब घ्यावे, अदानी समूहातील सर्व उद्योगांची चौकशी करावी आणि सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.
