अफगाणिस्तानात भूकंप दिल्लीला हादरली

काबुल – अफगाणिस्तानच्या हिंदूकुश प्रदेशात आज पहाटे ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपाचा हादरा दिल्ली-एनसीआर प्रदेशासह भारतातील काही भागात जाणवला. याबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एसीएस) ने माहिती दिली की, हा भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे ७५ किमी खोलवर होता. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, भूकंपानंतर काही काळ घबराट पसरली.