अमेरिकेच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या संचालकपदी तुलसी गब्बार्ड यांची निवड

वॉशिंग्टन – अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या अध्यक्षपदी भारतीय वंशाच्या तुलसी गब्बार्ड यांची नियुक्ती केली आहे.गब्बार्ड याआधी डेमॉक्रेटीक पक्षामध्ये होत्या. त्यांनी सन २०२१ ते २०२३ अशी तीन वर्षे डेमॉक्रेटीक पार्टीमधून हवाई देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे. २०२४ साली त्यांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला. त्यानंतर ट्रम्प यांनी आता त्यांची या महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.तुलसी गब्बार्ड यांनी आपल्या आजवरच्या राजकीय वाटचालीत धाडसी वृत्तीचे दर्शन घडविले आहे. घटनात्मक अधिकारांचे रक्षण आणि शांतता प्रस्थापित करण्याचे त्यांचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील,अशी अपेक्षा करतो,असे तुलसी गब्बार्ड यांच्या नियुक्तीची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले.