कॅन्सस – अमेरिकेतील एका भारतीय वंशाच्या कॅथलिक धर्मगुरूची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅन्ससमधील सेनेका सिटीमध्ये हे हत्याकांड घडले. अरुल कारसाला असे या हत्या झालेल्या धर्मगुरूचे नाव आहे. या प्रकरणी ओक्लाहोमा येथील एका व्यक्तीला संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
५७ वर्षांचे कारसाला २०११ पासून सेनेका येथील सेंट्स पीटर आणि पॉल कॅथोलिक चर्चमध्ये पाद्री होते. गुरुवारी दुपारी
चर्चच्या बाहेर एका व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. चर्चच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेतून त्यांना रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांनी या प्रकरणी गॅरी हर्मेश या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. त्याला तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. पाद्रीला गोळ्या का मारण्यात आल्या, याविषयी माहिती मिळालेली नाही.