नागपूर – मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर नाराज होऊन गावाकडे परतले. काल नागपुरात राज्यातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी खोतकर यांना मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र मंत्रीपद मिळाले नाही. आज राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खोतकर जालन्याला गावाकडे रवाना झाले.
