Home / News / आधार कार्डशिवाय भेटणार नाही खासदार कंगनाचा अजब फतवा

आधार कार्डशिवाय भेटणार नाही खासदार कंगनाचा अजब फतवा

नवी दिल्ली- मला भेटायला यायचे असेल मंडी मतदारसंघाचे आधारकार्ड अनिवार्य आहे. ते घेऊनच या, असा अजब फतवा नवनिर्वाचित भाजपा खासदार...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- मला भेटायला यायचे असेल मंडी मतदारसंघाचे आधारकार्ड अनिवार्य आहे. ते घेऊनच या, असा अजब फतवा नवनिर्वाचित भाजपा खासदार कंगना रणौतने काढला आहे. तसेच भेटायला येणार्‍यांना भेटण्याचे कारण एका कागदावर नमूद करावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आल्यावर कंगना मंडीतील पंचायत भवन येथे लोकांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी एेकून घेणार आहेत. परंतु त्यासाठी त्यांनी भेटायला येणार्‍यांनी आधार कार्ड घेऊन येण्याची अट घातली आहे. याविषयी बोलताना खा.कंगना म्हणाली की, हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पर्यटक येतात. त्यांना मला भेटायचे असते. परंतु त्यांच्यामुळे माझ्या मतदारसंघातील लोकांची गैरसोय होऊ शकते. यासाठीच मंडी भागातील नागरिकांना मला भेटायचे असल्यास आधार कार्ड गरजेचे आहे. तसेच कामाबाबतची माहिती कागदावर लिहिल्यास ते समजून घेणे सोपे होईल. काँग्रेसचे नेते विक्रमादित्य यावरून कंगनावर टीका करून असे म्हटले आहे की, जनतेला अशी वागणूक देणे योग्य नाही.

Web Title:
संबंधित बातम्या