आष्टीत बस अपघातात १२ विद्यार्थी जखमी

बीड – बीड जिल्ह्यातील आष्टी येथे आज सकाळी शाळेच्या बसचा अपघात झाला. या अपघातात वाहनचालकासह १२ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस बीड रस्त्यावरील बेलगाव चौकात आली असताना तिची कारशी धडक झाली. त्यानंतरचालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या धडकेत बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. अपघात होताच घटनास्थळी गोंधळ उडाला. स्थानिकांनी तत्काळ मदत करत विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. या अपघातामुळे या रस्त्यावर बराच काळ वाहतूक कोंडी झाली होती.